खेळ
क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा मुकुट
By Shivani - 1/10/2026 11:22:25 PM
Share This News:
क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा मुकुट
(अर्थव शेळकेची विक्रमी खेळी)
कोल्हापूर दि. 01 : कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने मेरी वेदर मैदान, कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या महानगरपालिकास्तर क्रिकेट स्पर्धेमध्ये विवेकानंद कॉलेजच्या 19 वर्षाखालील मुलांच्या संघाने कॉमर्स कॉलेजवर 17 धावांनी विजय संपादन केला.
तसेच उपांत्य पूर्व सामन्यात विवेकानंद च्या अर्थव शेळके ने डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज संघा बरोबरच्या कोल्हापूर शालेय क्रिकेट स्पर्धेमधील 28 चेंडू मध्ये नाबाद 115 धावा करून रेकॉर्ड करीत इतिहास निर्माण केला.
सदर संघाची रत्नागिरी येथे होणाऱ्ऱ्या विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजेता मुलांचा संघ: अथर्व महेंद्र शेळके, हर्षद मनोहर कुंभोजे, शिवजींत दुलीप इंदुलकर, वेदांत प्रशांत पाटील, राजवर्धन अभिजित मोरे, रणवीर संग्राम पाटील, मयंक मधुर राठोड, प्रेम मिलिंद चौगले, पृथ्वेश दयानंद जाधव, नीलमेघ मिलिंद नागावकर, धैर्यशील धनाजी पाटील, ओम दयानंद पाटील, ईशान विजय देवणे, आदर्श दत्ता रावळ, अथर्व प्रसाद ओतारी, राजदिप रवींद्र मंडलिक, प्रशिक्षक : प्रा. साद मुजावर, प्रा. संतोष कुंडले
संघातील खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. एस. के धनवडे व श्री सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.
क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा मुकुट
|