बातम्या
झोनल व इंटर झोनल मैदानी स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालयाचा महिला संघ ठरला उपविजेता
By nisha patil - 11/17/2025 2:44:35 PM
Share This News:
झोनल व इंटर झोनल मैदानी स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालयाचा महिला संघ ठरला उपविजेता
कोल्हापूर 17: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत झोनल व इंटरझोनल मैदानी स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालयाच्या महिला संघाने विविध मैदानी खेळ प्रकारांमध्ये घवघवीत यश मिळवून कोल्हापूर झोन व इंटरझोन उपविजेतेपद चॅम्पियनशिप मिळवली. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या संघामध्ये कु.रिया पाटील.एम.एस्सी. सी.एस- १, झोनल मैदानी स्पर्धेमध्ये ४०० मीटर धावणे गोल्ड मेडल तर इंटरझोनल ४०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये ५६.७५ इतक्या वेळेमध्ये स्पर्धा पूर्ण करून सुवर्णपदक मिळवले. त्याचबरोबर मैदानी महिला गटामध्ये वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवून ती सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.
कु.तितिक्षा पाटोळे बी.ए.२ हिने झोन १००मीटर धावणे गोल्ड मेडल, २०० मीटर धावणे गोल्ड मेडल, इंटरझोनल १०० मीटर धावणे गोल्ड मेडल तर २०० मीटर धावणे ब्राँझ मेडल मिळविले. कु.तन्वी जमसांडेकर बी.बी.ए. ३ हिने झोन २०० मीटर सिल्वर, तिहेरी उडी ब्राँझ मेडल, तर इंटरझोनल स्पर्धेमध्ये तिहेरी उडी सिल्वर मेडल प्राप्त केले. कु.रितिका मगदूम, एम. ए. २ हिने झोनल स्पर्धेयमध्ये लांब उडी – गोल्ड मेडल, १०० मीटर ब्राँझ मेडल, तर इंटरझोनल स्पर्धेमध्ये लांब उडी - गोल्ड मेडल मिळविले. कु.गौरी भारती बी.एस.सी ३ हिने झोन व इंटरझोन थाळीफेक क्रीडाप्रकारात सिल्वर मेडल मिळविले. कु.सानिका बोडके बी.एस.सी. १ हिने १०० मीटर हर्डल्स ब्राँझ मेडल. प्राप्त केले. कु.श्रावणी जाधव बी.कॉम १ हिचा रिले संघात समावेश. तसेच या संघाने झोनल स्पर्धेत ४ × १०० मीटर रिले गोल्ड मेडल तर ४ × ४०० मीटर रिले गोल्ड मेडल मिळवले. तसेच इंटरझोनल स्पर्धेत ४ × १०० मीटर रिले गोल्ड मेडल प्राप्त केले. सर्व यशस्वी खेळाडूचे अभिनंदन
यशस्वी खेळाडूला श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, आय.क्यू. ए.सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी,जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के धनवडे व श्री सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.
झोनल व इंटर झोनल मैदानी स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालयाचा महिला संघ ठरला उपविजेता
|