बातम्या
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे कंपनी सेक्रेटरी विषयी मार्गदर्शक कार्यशाळा संपन्न
By Administrator - 10/2/2026 2:06:04 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे कंपनी सेक्रेटरी विषयी मार्गदर्शक कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर दि.10: कंपनी सेक्रेटरी हे एक रोजगाराचे उत्तम क्षेत्र आहे. कोणत्याही शाखेचा किमान १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी हा कंपनी सेक्रेटरी कोर्ससाठी पात्र ठरतो. . कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यास वेगवेगळ्या स्तरांवर परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जिद्द आणि मेहनत आवश्यक आहे.
कंपनी सेक्रेटरी हा कंपनी बोर्ड ऑफ डायरेक्टर,भागधारक व रेग्युलेटरी अथोरिटीच्या मध्ये एक महत्वपूर्ण कडी आहे. कंपनीमध्ये गुड गव्हर्नन्स प्रॅक्टिसेस व कॉर्पोरेट गव्हर्नन्स नियमांच्या पालनावर बोर्ड ऑफ डायरेक्टरला ॲडव्हाइस देणे व ते प्रत्यक्षात त्याचा पालन करणे हे कंपनी सेक्रेटरीचे मुख्य काम आहे. कंपनीला प्रोत्साहन देणे, सेक्रेटरीअल रेकॉर्ड ठेवणे इत्यादी कामे कंपनी सेक्रेटरी करतो व कंपनी सेक्रेटरी म्हणून उपलब्ध असणाऱ्या अनेक करियरच्या संधींविषयी माहिती कार्याशाळे दरम्यान प्रमुख वक्ते सीएस कपिला टिक्के आणि सीएस कोमल आसवानी यांनी विद्यार्थांना दिली. कोल्हापूर चॅप्टर चे नूतन चेअरमन सीएस स्वप्निल पाटोळे या कार्यशाळेस उपस्थिस्त राहून त्यांनी देखील सी एस कोर्से ची संपूर्ण माहिती सांगितली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय थोरात यांनी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा व आपले सुरक्षित भविष्य घडवावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे आयोजन वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. सनी काळे व इतर सहकारी प्राध्यापकांनी केले. सदर कार्यशाळेस महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिस्त होते.
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे कंपनी सेक्रेटरी विषयी मार्गदर्शक कार्यशाळा संपन्न
|