बातम्या
विवेकानंद कॉलेजचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव
By nisha patil - 3/9/2025 3:35:27 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव
विवेकानंदच्या एन.एस.एस. विभागातर्फे गणेशमूर्ती व निर्माल्य्ा संकलन
कोल्हापूर दि. 3 : येथील विवेकानंद महाविद्यालयातील ज्युनिअर व सिनिअर एन.एस.एस. विभागामार्फत कसबा बावडा येथील पंचगंगा नदी घाट येथे गणेशमूर्ती व निर्माल्य् संकलन करण्यात आले.
घरगुती गणपती विसर्जन प्रसंगी नदीचे पाणी प्रदुषण व पर्यावरण हानी टाळण्यासाठी विवेकानंद कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्फत गणेशमूर्ती व निर्माल्य् संकलन करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. विवेकानंद कॉलेजच्या मूर्तीदान आवाहनास कसबा बावडयातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी संकलित केलेल्या मुर्ती महानगरपालिका प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात आल्या.
या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा.संदीप पाटील, प्रा.पी.आर.बागडे प्रा. ए. आर. धस, प्रा सौ एस पी वेदांते, प्रा एल.ई. नरोन्हा यांनी केले. सदर कार्यक्रमास स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कॉलेजचे रजिस्ट्रार श्री. एस.के.धनवडे व प्रशासकीय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
विवेकानंद कॉलेजचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव
|