बातम्या
विवेकानंद महाविद्यालयाचे तलवारबाजी स्पर्धेत यश
By nisha patil - 9/29/2025 3:22:22 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयाचे तलवारबाजी स्पर्धेत यश
कोल्हापूर दि.29 शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इंटरझोनल महिला व पुरुष तलवारबाजी स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरच्या तलवारबाजी च्या संघाने चार गोल्ड, दोन सिल्वर व तीन ब्राँझ मेडल मिळवून बाजी मारली. महाविद्यालयाचा संघ शिवाजी विद्यापीठाच्या तलवारबाजी च्या संघामध्ये स्थान निश्चित करून गुरुनानक देव युनिव्हर्सिटी अमृतसर येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी पात्र ठरला.
महाविद्यालयाचा तलवारबाजी संघ
१)श्रवण काटकर बी. ए भाग १
खेळ प्रकार - फॉइल - गोल्ड मेडल इपी - ब्राँझ मेडल
२) श्रीशैल शिंदे बी.एस.सी सी.एस भाग ३
सेबर - सिल्वर मेडल *ईपी - गोल्ड मेडल
३) रितेश पोवार बी. ए. भाग २ फॉइल - ब्राँझ मेडल
४) श्लोका शिंदे एम. एस. सी सी .एस. भाग २ फॉइल - गोल्ड मेडल सेबर - गोल्ड मेडल
५) निकिता मुळे बी.एस.सी. भाग २ इपी - ब्राँझ मेडल.
6) सई पवार - बी. कॉम. भाग १ *फॉइल - सिल्वर मेडल*
यशस्वी खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे , संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे मॅडम, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार , आय . क्यू.ए.सी. समन्वयक डॉ .श्रुती जोशी ,जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव , प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर,महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंद महाविद्यालयाचे तलवारबाजी स्पर्धेत यश
|