शैक्षणिक
परीक्षेत विवेकानंद कॉलेजचे धवल यश
By nisha patil - 7/6/2025 3:15:27 PM
Share This News:
परीक्षेत विवेकानंद कॉलेजचे धवल यश
कोल्हापूर : मे 2025 मध्ये झालेल्या JEE Advance परीक्षेत विवेकानंद कॉलेजचा विद्यार्थी कु. प्रथमेश निलेश ढगे याने AIR 8641 रँक मिळवून धवल यश संपादित केले. त्याच्या या यशाबद्दल विवेकानंद कॉलेजच्या वतीने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण् संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार , प्रा.एस एन साळुंखे, सौ शिल्पा भोसले, प्रा सौ गीतांजली साळुंखे , प्रा के जे गुजर, प्रा सौ एस एन ढगे, प्रा एस टी शिंदे , प्रा एन एन हिटणीकर, प्रा सौ एस पी पाटील, प्रा आर व्ही घाटगे व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.
त्याच्या या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ शुभांगी गावडे यांनी अभिनंदन करुन त्याला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कु. प्रथमेशला विवेकानंद कॉलेजच्या विज्ञान शाखेतील प्राध्यापकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
परीक्षेत विवेकानंद कॉलेजचे धवल यश
|