शैक्षणिक
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ३८ व्या स्मृतिदिनानिमित्त विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
By nisha patil - 5/8/2025 3:12:33 PM
Share This News:
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ३८ व्या स्मृतिदिनानिमित्त विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर | दि. ५ ऑगस्ट २०२५ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरच्या वतीने संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ३८ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार, दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. स्मृतिभवन, कोल्हापूर येथे स्मृतिसमारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे भूषवणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शालेय शिक्षण, गृह (ग्रामीण), सहकार, खनिकर्म व गृहनिर्माण राज्यमंत्री मा. ना. पंकज भोयर यांची उपस्थिती राहणार आहे.
प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध कवी व व्याख्याते अविनाश भारती हे “आजची संस्कृती व डॉ. बापूजी साळुंखे यांची विचारधारा” या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, संस्था प्रार्थना व महेश हिरेमठ यांच्या सुमधुर गायनाने होणार आहे. या प्रसंगी संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दुपारी विशेष सत्रात मुख्याध्यापकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास संस्था सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे, सहसचिव (प्रशासन) एस. एम. गवळी, सहसचिव (अर्थ) प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, तसेच संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी आणि १३ जिल्ह्यांतील ४१० शाखांमधील गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला शिक्षणप्रेमी, अभ्यासक, विचारवंत, गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले आहे.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ३८ व्या स्मृतिदिनानिमित्त विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
|