शैक्षणिक

विवेकानंद ज्युनिअर कॉलेजचा कळंबा तलाव परिसरात देशी वृक्षबीया रोपण उपक्रम

Vivekananda Junior College


By nisha patil - 7/31/2025 12:06:59 PM
Share This News:



विवेकानंद ज्युनिअर कॉलेजचा कळंबा तलाव परिसरात  देशी वृक्षबीया रोपण उपक्रम

कोल्हापूर  :  येथील विवेकानंद कॉलेजच्या आर्ट्स- कॉमर्स विभागा मार्फत पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा या विषयाअंतर्गत देशी वृक्षांच्या बिया रोपनाचा उपक्रम कळंबा तलाव परिसरात राबविण्यात आला.  या उपक्रमामध्ये इयत्ता १२ वी वर्गातील ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी यापूर्वीच जमा केलेल्या देशी वृक्षांच्या ३५  विविध प्रजातींच्या बियांचा या रोपणा मध्ये समावेश होता. यामध्ये चिंच, करंज, खैर, आंबा, कडुनिंब, बहावा, काटेसावर, ताम्हण, बेल, सीताफळ,रामफळ जांभूळ,काजू इत्यादींचा समावेश होता. यासोबतच येथील निसर्गरम्य परिसरात विद्यार्थ्यांनी विविध वनस्पती, कीटक, वृक्ष प्रजाती, पक्षी यांचाही चिकित्सक अभ्यास करत येथील पाण्यात मनमुराद भिजण्याचाही आनंद घेतला.

या उपक्रमाचे आयोजन विभागप्रमुख प्रा.सौ.शिल्पा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा विषय शिक्षक श्री.अनिल धस यांनी नियोजन केले. या पर्यावरण पूरक उपक्रमास प्राचार्य डॉ.आर. आर. कुंभार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ज्येष्ठ प्राध्यापक श्री विश्वंभर कुलकर्णी व प्रा.सौ माधवी देशपांडे यांनीही उपस्थित राहून उपक्रम यशस्वी करण्यामध्ये मोलाचे सहकार्य केले. स्टाफ सेक्रेटरी श्री.बी.एस.कोळी व सर्व शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही विशेष  सहकार्य लाभले.

 


विवेकानंद ज्युनिअर कॉलेजचा कळंबा तलाव परिसरात देशी वृक्षबीया रोपण उपक्रम
Total Views: 73