शैक्षणिक
विवेकानंद ने सकारात्म्क दृष्टिकोन तयार केला प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार
By Administrator - 6/8/2025 5:30:13 PM
Share This News:
विवेकानंद ने सकारात्म्क दृष्टिकोन तयार केला प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार
.
शिक्षण एक सतत चालणारी रचनात्मक प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांच्या अंतरंगातील क्षमता विकास
निरंतरपणे करुन त्यांच्यात सकारात्मक दृष्टीकोन तयार करण्याचे काम विवेकानंद कॉलेजने करुन दाखवले आहे. नैतिक सुसंस्कारित पैलूयुक्त् गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी मन, शरीर आणि आत्मा यांच्याशी सुसंवाद करुन गुणवत्तापूर्ण आधुनिक शिक्षणात सक्षम घडवावे. असे मत विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार यांनी मांडले.
आपल्या भाषणात प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार पुढे म्हणाले,आयुष्यभर काम करायचे जीवन कसे जगावे, स्वत:ची ओळख स्वत: करुन घेण्यासाठी थोरामोठयांची चरित्रे ग्रंथालयात वाचावीत. विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा, सांस्कृतिक, नृत्य् वाद्यवादन इत्यादी कलागुणांचा विकास करण्यासाठी संगणकाच्या सहकार्याने कृत्रिम बुध्दीमतेचे येणारे जग अभ्यासावे.
येथील विवेकानंद ज्युनिअर कॉलेज मध्ये कला व वाणिज्य् स्वागत समारंभात अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा सौ शिल्पा भोसले यांनी केले. याप्रसंगी त्या म्हणाल्या, कोल्हापूर परिक्षेत्रात विवेकानंद कॉलेज विद्यार्थ्यांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत सुसंस्काराचे सहज शिक्षण् देत असते.
पालक प्रतिनिधी स्नेहल जगदाळे , सागर जाधव, कु.समृध्दी चौगले, अनिष्का मिश्रा यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रारंभी संस्थेची प्रार्थना झाली. प्रा सौ एस पी वेदांते व प्रा अश्विनी गायकवाड यानी सुत्रसंचालक केले. प्रा बी.एस. कोळी यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक, पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
विवेकानंद ने सकारात्म्क दृष्टिकोन तयार केला प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार
|