बातम्या

इंटर झोनल महिला व पुरुष बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विवेकानंद ला दुहेरी मुकुट

Vivekananda wins double crown in Inter


By nisha patil - 11/27/2025 11:37:02 AM
Share This News:



इंटर झोनल महिला व पुरुष बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विवेकानंद ला दुहेरी मुकुट

 कोल्हापूर 27: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, आष्टा यांच्या संयुक्त  विद्यमाने  शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इंटर झोनल महिला व पुरुष बॅडमिंटन स्पर्धे मध्ये विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूरच्या महिला व पुरुष बॅडमिंटन संघाने प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी मुकुटाचे मानकरी ठरले आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यशस्वी खेळाडूंना  स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.पी.थोरात, आय. क्यू.ए.सी.समन्वयक डॉ.श्रुती जोशी,जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के धनवडे व  सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.

                           


इंटर झोनल महिला व पुरुष बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विवेकानंद ला दुहेरी मुकुट
Total Views: 14