बातम्या

विवेकानंदच्या कृष्णा शेळके हिची ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी निवड

Vivekanandaas Krishna Shelke selected


By nisha patil - 2/1/2026 5:11:28 PM
Share This News:



विवेकानंदच्या कृष्णा शेळके हिची ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी निवड

 कोल्हापूर दि. 2 :  विवेकानंद कॉलेज कोल्हापूर बी.कॉम. भाग १ मध्ये शिकत असणारी विद्यार्थीनी कु. कृष्णा शेळके  हिने शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या आंतरविभागीय जलतरण स्पर्धेमध्ये ५० मीटर व १०० मीटर बटरफ्लाय खेळप्रमध्ये प्रत्येकी २ गोल्ड पदक त्याच बरोबर २०० मीटर बटरफ्लाय मध्ये सिल्वर पदक मिळवत शिवाजी विद्यापीठाच्या महिला जलतरण संघामध्ये स्थान निश्चित करत  ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी जलतरण स्पर्धेकरिता पात्र ठरली.

तसेच या कामगिरीवर तिची ५ वी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या जलतरण संघात  ४×१०० मीटर रिले मध्ये निवड झाली. या कामगिरी मुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तिला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.थोरात, आय.क्यू.ए.सी.समन्वयक डॉ.श्रुती जोशी,जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, रजिस्ट्रार एस. के धनवडे,  सुरेश चरापले, आई व वडील यांचे मार्गदर्शन लाभले.


विवेकानंदच्या कृष्णा शेळके हिची ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी निवड
Total Views: 19