बातम्या

विवेकानंदची कु.श्रेया बराले हिची ऑल इंडिया तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

Vivekanandas Ms Shreya Barale selected for All India Taekwondo Competition


By Administrator - 5/3/2026 5:17:23 PM
Share This News:



विवेकानंदची कु.श्रेया बराले हिची ऑल इंडिया तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर 5: शिवाजी विद्यापीठ अंतर्गत डी. वाय पाटील कॉलेज, साळोखेनगर येथे घेण्यात आलेल्या आंतर विभागीय तायक्वांदो महिला व पुरुष स्पर्धा यामध्ये विवेकानंद महाविद्यालयाची बी. ए .भाग ३ मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी कुमारी श्रेया विश्वास बराले हिने ४६ किलो खालील वजनी गटात सुवर्ण पदक मिळवून ओडीसा येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी तायक्वांदो स्पर्धेमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी च्या संघा मध्ये आपले स्थान निश्चित केले. या यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 या यशाबद्दल कु. श्रेया बराले हिला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. तसेच विवेकानंद कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी, जिमखाना विभागप्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, रजिस्ट्रार एस. के. धनवडे, श्री सुरेश चरापले तसेच तिच्या आई-वडिलांचे मार्गदर्शन तिला लाभले.

श्रेया  बरालेच्या या यशामुळे विवेकानंद कॉलेज व शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा परंपरेचा अभिमान अधिकच उंचावला आहे.


विवेकानंदची कु.श्रेया बराले हिची ऑल इंडिया तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड
Total Views: 6