बातम्या
विवेकानंदची तेजश्री गायकवाड राज्यात पाचवी
By nisha patil - 10/5/2025 3:50:30 PM
Share This News:
विवेकानंदची तेजश्री गायकवाड राज्यात पाचवी
“आर्टस फॅकल्टीतून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले”
कोल्हापूर दि.10: विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर च्या राज्यशास्त्र विभागाची माजी विद्यार्थिनी कु.तेजश्री बबन गायकवाड हिने राज्यसेवा परीक्षा २०२३ मधून सहाय्यक गट विकास अधिकारी हे पद मिळविले. या परीक्षेमध्ये ती मुलींच्यामध्ये राज्यात पाचवी आलेली आहे. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तिने मोलमजूरी करणाऱ्या कुटुंबातून प्राप्त केलेले हे यश कौतुकास्पद आहे.
या यशात तिच्या आई वडीलांचे योगदान महत्वपूर्ण आहे. तिला या यशामध्ये आमच्या विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी प्राचार्या सौ.शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार, आयक्यूएसी समन्वयक डॉ.श्रृती जोशी, प्रा.डी.ए.पवार यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
विवेकानंदची तेजश्री गायकवाड राज्यात पाचवी
|