बातम्या
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची ‘गोकुळ’ प्रकल्पास औद्योगिक भेट
By nisha patil - 1/10/2025 3:45:58 PM
Share This News:
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची ‘गोकुळ’ प्रकल्पास औद्योगिक भेट
कोल्हापूर दि. 1: येथील विवेकानंद कॉलेजच्या बी. कॉम. भाग 3 च्या 35 विद्यार्थी, विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गोकूळ दूध प्रकल्पास औद्योगिक भेट दिली.
यावेळी गोकुळ दूध संघाच्या श्री. सचिन लोहार व श्री आशुतोष महेकर या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दूध प्रकल्पातील संपूर्ण प्रक्रियेची आणि दुग्धजन्य् पदार्थांची निर्मिती कशी केली जाते. याबद्दल माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली.
या भेटीचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य् विभाग प्रमुख प्रा सनी काळे यांनी केले होते. यावेळी विद्यार्थ्यासमवेत डॉ. अमोल मोहिते, प्रा. ओंकार कुलकर्णी उपस्थित होते.
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची ‘गोकुळ’ प्रकल्पास औद्योगिक भेट
|