राजकीय
आजऱ्यात मतदारांचा कडक सवाल; ‘मत का द्यावे?’
By nisha patil - 11/22/2025 3:28:12 PM
Share This News:
आजऱ्यात मतदारांचा कडक सवाल; ‘मत का द्यावे?’
फलकाने उमेदवारांची झोप उडाली!
आजरा नगरपंचायतीच्या रणधुमाळीत एका मतदाराने घरासमोर “मत का द्यावे, ते समजावून सांगू शकणाऱ्यांनीच यावे” असा फलक लावून उमेदवारांना थेट आव्हान दिलं आहे. समाजमाध्यमांवर या फलकाची जोरदार चर्चा सुरू आहे. तीन आघाड्या आणि अपक्ष उमेदवार मैदानात असताना या सवालाने राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
आजऱ्यात मतदारांचा कडक सवाल; ‘मत का द्यावे?’
|