बातम्या
जिल्ह्यात ३१८ केंद्रांवर उद्या मतदान; कडेकोट बंदोबस्त, विजयी मिरवणुकींवर स्पष्ट बंदी
By nisha patil - 1/12/2025 3:57:22 PM
Share This News:
जिल्ह्यात ३१८ केंद्रांवर उद्या मतदान; कडेकोट बंदोबस्त, विजयी मिरवणुकींवर स्पष्ट बंदी
जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी मंगळवारी (२ डिसेंबर) मतदान होणार असून ३१८ मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तब्बल ८०० पोलिस, ८०० होमगार्ड, तसेच जलद कृती दलाच्या तुकड्या सज्ज असून संबंधित पोलिस ठाणे आणि महसूल विभागाची भरारी पथके नाक्यांवर चौकशी करत आहेत. वाहनांची काटेकोर तपासणी सुरू आहे.
सोमवारी सकाळी बंदोबस्त वाटप होऊन सर्व कर्मचारी आपल्या नियुक्त ठिकाणी रवाना झाले. मतदान सुरळीत पार पडण्यासाठी ६९२ पोलिस कर्मचारी, ९२ अधिकारी, ८०० होमगार्ड आणि दोन QRT तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
बुधवारी (ता. ३) मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार असून जिल्ह्यात आठ डिसेंबरपर्यंत जमावबंदी असल्याने कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुकींना कठोर बंदी लागू राहील. विनापरवाना मिरवणूक काढल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिला आहे.
जिल्ह्यात ३१८ केंद्रांवर उद्या मतदान; कडेकोट बंदोबस्त, विजयी मिरवणुकींवर स्पष्ट बंदी
|