ताज्या बातम्या

वृषाली तेरदाळे हीची मंडळ कृषी अधिकारी पदी निवड

Vrushali Terdale selected as Board Agriculture Officer


By nisha patil - 2/13/2026 11:40:09 AM
Share This News:



वृषाली तेरदाळे हीची मंडळ कृषी अधिकारी पदी निवड


शिरढोण प्रतिनिधी(संजय गायकवाड):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने  २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेतून मंडळ कृषी अधिकारी (राजपत्रित वर्ग २) पदी वृषाली रावसो तेरदाळे ( कवठेसार ता.शिरोळ) हीची निवड झाली आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेली विद्यार्थिनीने प्रामाणिकपने प्रयत्न केल्यास आणि जिद्द कायम ठेवल्यास यश निश्चित मिळते हे वृषालीने दाखवून दिले आहे.
कवठेसार सारख्या ग्रामीण भागात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या वृषालीने कृषी सेवा परीक्षेत  उज्ज्वल यश संपादन केले. सुरुवातीपासूनच आपण शासकीय सेवेत जाऊन अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. अधिकारी व्हायचे असेल तर  कठोर परिश्रमाची तयारी करावी लागते याची जाणीव  सुरुवातीपासून होती. आई वडील, घरातील सर्व मंडळी  यांनी शिक्षणासाठी  प्रोत्साहन दिले. माध्यमिक शिक्षण दादा नाना भोकरे हायस्कूल कवठेसार, कृषी पदवीचे शिक्षण शरद कृषी कॉलेज जैनापुर व पदव्युत्तर शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पूर्ण केले.
 अभ्यासात सातत्य ठेवून  स्पर्धा परीक्षा अभ्यास धर्मनगर अकॅडमी व पुणे येथील एक्सलन्स ॲग्री अकॅडमी येथे केला. आणि एक वर्षाच्या परिश्रमाने तिने कृषि विभागाने घेतलेल्या  कृषी सेवक  परिक्षेत यश मिळविले सध्या वृषाली शिरढोण येथे कृषि सेवक म्हणून कार्यरत आहे.कृषि सेवक पदी रुजू झाल्यानंतर काम करीत असताना तिने आपला अभ्यास कधी बंद केला नाही. या यशा बद्दल तिचे सर्व स्तरातून  कौतुक केले जात आहे.


वृषाली तेरदाळे हीची मंडळ कृषी अधिकारी पदी निवड
Total Views: 104