बातम्या

व्यंकटराव प्रशालेत एच .पी .व्ही. लसीकरण मार्गदर्शन संपन्न

Vyankarav hpv


By nisha patil - 5/25/2026 9:51:52 PM
Share This News:



*व्यंकटराव प्रशालेत एच .पी .व्ही. लसीकरण मार्गदर्शन संपन्न*

आजरा(हसन तकीलदार)**:-येथील व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी व उपकेंद्र पारेवाडी येथील आरोग्य सेवक दीपक हरणे तसेच आरोग्य सेविका सुचिता मॅडम यांनी एच. पी .व्ही. लसीकरणासंदर्भात माहिती प्रशालेतील शिक्षक शिक्षिका ,पालक व विद्यार्थिनी यांना आयोजित कार्यक्रमांमध्ये सांगितली.

प्रथम प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर यांनी आरोग्यसेवकांचे स्वागत केले त्यानंतर आरोग्य सेविका सुचिता मॅडम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भारतामध्ये दर दिवशी कमीत कमी 28 व्यक्ती कॅन्सर सारख्या आजारानी मृत्यूमुखी पडतात. या आजाराविषयी जनजागृती व्हावी आणि काळजी घेणे कामी महाराष्ट्र शासनाने अथवा भारत सरकारने हा आजार होण्याअगोदरच त्याची लस जर वय वर्ष 14 ते 15 या वयोगटातील शालेय मुलींना दिली तर त्यांचे जीवनमान समृद्ध होईल. महत्त्वाचे म्हणजे ही लस प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनामार्फत मोफत दिली जाते. त्यामुळे प्रसार माध्यमांमध्ये पसरलेल्या अफवांवर विश्वास न ठेवता कॅन्सरसारखा जीवघेणा भयंकर आजार भविष्यकाळात होऊ नये म्हणून मुलींनी ही लस घेणे गरजेची आहे. त्यासाठी संबंधित मुलीना त्यांच्या पालकांनी आरोग्य केंद्रात स्वतः घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले. 

प्राचार्य एम.एस. नागुर्डेकर यांनी शासनाच्या या मोफत लस टोचणे उपक्रमाचे स्वागत करून आभार मानले.. कारण बाहेर खाजगी दवाखान्यात भरमसाठ पैसे देऊन तीन- तीन डोस घ्यावे लागतात.. म्हणून संबंधित पालकांनी जागृत होऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील- अर्दाळकर पी.जी. यांनी व आभार एम. ए. पाटील यांनी मानले.

कार्यक्रमासाठी सीनियर कॉलेजचे प्र.प्राचार्य पन्हाळकर सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.


व्यंकटराव प्रशालेत एच .पी .व्ही. लसीकरण मार्गदर्शन संपन्न
Total Views: 83