बातम्या

व्यंकटराव महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची नाशिक येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड*

Vyankarav mahavidyalay


By nisha patil - 8/4/2026 9:43:53 PM
Share This News:



*व्यंकटराव महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची नाशिक येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड*..

**आजरा(हसन तकीलदार)*:-. येथील व्यंकटराव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आजरा मधील कु. मधुरा प्रकाश दळवी व कु. साधना महेश होसुरकर यांची नाशिक सिन्नर येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच व्यंकटरावचे कबड्डी खेळातील वर्चस्व कायम ठेवत नुकत्याच ( कोथली) करवीर येथे झालेल्या राज्यस्तरीय खुल्या महिला कबड्डी स्पर्धेमध्ये व्यंकटराव महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चुरशीचा सामना करत शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला आणि द्वितीय क्रमांक मिळवला.

कबड्डी क्षेत्रात सातत्यपूर्ण सराव करत विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या उज्वल यशाबद्दल व्यंकटराव शिक्षण संकुलाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी व संचालक मंडळ यांनी कौतुक व अभिनंदन केले.

    यशस्वी महिला कबड्डी खेळाडू व मार्गदर्शक (एन.आय.एस) शिक्षक पी.आर.तेरसे व कु. पी. एल.सासुलकर यांचे प्रत्यक्ष मैदानात येऊन संस्थेचे संचालक सचिन शिंपी यांनी सत्कार केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. व्ही.शेळके, प्रभारी प्राचार्य सी.एस.पन्हाळकर आदिजण उपस्थित होते.


व्यंकटराव महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची नाशिक येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड*
Total Views: 181