बातम्या

व्यंकटरावच्या विद्यार्थ्यांनी आजरा बसस्थानक केले स्वच्छ

Vyankarav studant


By nisha patil - 3/27/2026 3:27:01 PM
Share This News:



व्यंकटरावच्या विद्यार्थ्यांनी आजरा बसस्थानक केले स्वच्छ

**आजरा(हसन तकीलदार)*:.. येथील व्यंकटराव शिक्षण संकुलातील पर्यावरण सेवा विभागातील विद्यार्थी ,मार्गदर्शक शिक्षक, प्राचार्य व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वच्छ बसस्थानक, सुंदर बसस्थानक या उपक्रमांतर्गत आजरा बसस्थानक स्वच्छ केले.

    आजरा तालुक्यातून जवळजवळ 60 ते 70 खेडोपाड्यातून व्यापार खरेदी, प्रवास या निमित्ताने आजरा या तालुक्याच्या ठिकाणी प्रवाशाची ये- जा असते. आजरा या शहराला निसर्गाने अतिशय सुंदर निसर्ग संपन्नता दिली आहे त्यामुळे हिरवीगार वनराईत येथील बस स्थानक दिमाखात उभे आहे. ते नेहमी स्वच्छ असतेच पण लहान मुलांमध्ये, प्रवाशांमध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून सांगणे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करत,वापर करत असताना समाजाने कशी काळजी घ्यावी याचे एक उदाहरण म्हणून व्यंकटराव प्रशालेतील पर्यावरण सेवा विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राचार्य एम.एम.नागुर्डेकर, एस.वाय.भोये, सौ.ए.एस.गुरव, अर्दाळकर- पाटील पी.जी., हवेश देसाई, यांनी स्वतः हातात झाडू घेऊन संपूर्ण बस स्थानक अंतर -बाह्य स्वच्छ केले.

    या कामी आगारप्रमुख प्रवीण पाटील, वाहतूक निरीक्षक सतीश भोगुलकर, लक्ष्मण गवळी, राजू येसादे, परशुराम कांबळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या अधिकाऱ्यांनीही या स्वच्छता मोहिमेत हिरीरीने सहभाग घेतला. व प्रवाशांनी कचरा कचराकुंडीतच टाकावा याबाबत विद्यार्थ्यांनी विनंतीपूर्वक सांगितले.

या उपक्रमाचे प्रवाशांनी कौतुक केले


व्यंकटरावच्या विद्यार्थ्यांनी आजरा बसस्थानक केले स्वच्छ
Total Views: 452