बातम्या

व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न

Vyankaterav yoga day


By nisha patil - 6/21/2026 7:38:49 PM
Share This News:



*व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न*                            

**आजरा(हसन तकीलदार)*:-21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त व्यंकटराव शिक्षण संकुल व आजरा नगरपंचायत महिला बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला.दिपप्रज्वलनानंतर सौ. चारुशीला जयदीप मोकाशी -जाधव व कन्या साईस्वरी जयदीप -जाधव यानी योग प्रात्यक्षिकाबरोबरच योगाचे मानवी जीवनातील स्थान व महत्त्व पटवून सांगितले. पूरक हालचाली पासून ते सूर्यनमस्कार,भुजंगासन,ताडासन, पद्मासन,वज्रासन,वृक्षासन यासारख्या अनेक आसनांचे प्रात्यक्षिक व महत्त्व सांगितले.

तसेच अनुलोम विलोम प्राणायाम ओंकार प्रार्थना करण्यात आली. योगासारख्या भारतीय प्राचीन संस्कृतीचा ठेवा आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे तसेच "आजच्या अतिशय धावपळीच्या युगामध्ये आपल्या मनावर बुद्धीवर भावनेवर नियंत्रण ठेवायचे असेल तर योगाशिवाय पर्याय नाही" असे आजरा महाल शिक्षण मंडळाचे सचिव व नगरसेवक अभिषेक शिंपी आपले विचार मांडताना सांगितले.

नगरसेविका डॉक्टर स्मिता कुंभार यांनी आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी आजरा नगरपंचायत महिला बालकल्याण सभापती सौ.निशात समीर चांद, अधीक्षक वैभव म्हाकवेकर, सदस्या नगरसेवक श्रीमती कलावती कांबळे, स्वीकृत नगरसेवक विक्रम पटेकर, आजरा महाल शिक्षण मंडळाचे संचालक सचिन शिंपी, व्यंकटराव शिक्षण संकुलातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता झुम्बा डान्स इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी व मार्गदर्शिका आर. एन. पाटील मॅडम यांनी केली. क्रीडा शिक्षक एस एम पाटील यांनीही विद्यार्थ्यांसोबत प्रात्यक्षिके केली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्राचार्य एस.एन. पाटील, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे.शेलार यांनी केले. सूत्रसंचालन आर. पी.होरटे, आभार पी. व्ही.पाटील, फलक लेखन व व्हिडिओ शूटिंग कलाशिक्षक कृष्णा दावणे यांनी केले. उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना आजरा नगरपंचायतीच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.


व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न
Total Views: 125