शैक्षणिक
व्यंकटराव शिक्षण संकुलात ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन*
By nisha patil - 11/28/2025 10:44:32 PM
Share This News:
*व्यंकटराव शिक्षण संकुलात ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन*
**आजरा(हसन तकीलदार)**:-आजरा येथील व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे संचालक सचिन शिंपी, सुनील पाटील, सुधीर जाधव विलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार उपस्थित होते.
दीन दलितांचे पालन हार, विविध जुन्या चालीरीती, रूढी,परंपरा ज्या स्त्रियांसाठी तसेच दीनदलितांसाठी अन्यायकारक होत्या त्याच्या विरोधात बंड पुकारून आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी व्यतीत केलेले थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याचा सखोल अभ्यास आपल्या मनोगतातून इतिहास शिक्षक संजय भोये यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.
ज्योतिबा फुले यांनी प्रथम आपल्या पत्नीला अक्षर ओळख करून दिली आणि तिच्या मार्फत स्त्रियांना शिक्षण देण्याचे कार्य केले. याबाबतची सविस्तर घटनात्मक माहिती प्राचार्य एम.एम.नागुर्डेकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
त्यानंतर काही विद्यार्थ्यांची मनोगते झाली व महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थ्यांना व्यासपीठावर आणण्यात आले. जोतिबा फुलेंची वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थी कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. या कार्यक्रमासाठी संयोजक वर्ग व वर्गशिक्षकांचे सहकार्य लाभले
व्यंकटराव शिक्षण संकुलात ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन*
|