बातम्या

व्यंकटराव शिक्षण संकुलात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*

Vyankrava education in babasaheb ambedkar jayant


By nisha patil - 4/14/2026 3:23:19 PM
Share This News:



व्यंकटराव शिक्षण संकुलात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*

आजरा (हसन तकीलदार)-:येथील व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा पटेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महामानवाच्या कार्याचा जयघोष करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे संचालक पांडुरंग जाधव,सचिन (भैय्या) शिंपी,सुधीर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर, ज्युनिअर विभाग प्रमुख एम. ए. पाटील, सीनियर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य पन्हाळकर सर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले डी. आर. पाटील यांनी आपल्या ओघवत्या आणि दर्जेदार वक्तृत्व शैलीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. बाबासाहेबांचे शिक्षण, त्यांनी केलेला संघर्ष आणि राष्ट्रासाठी दिलेले योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला.

शिक्षण संकुलातील सर्व स्तरांतील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे या जयंती उत्सवाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


व्यंकटराव शिक्षण संकुलात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*
Total Views: 191