शैक्षणिक
व्यंकटराव प्रशालेत येथे हिंदी ऑलिंपियाड परीक्षा पारितोषिक सोहळा संपन्न*
By nisha patil - 11/28/2025 10:48:20 PM
Share This News:
*व्यंकटराव प्रशालेत येथे हिंदी ऑलिंपियाड परीक्षा पारितोषिक सोहळा संपन्न* -
**आजरा(हसन तकीलदार)**:-व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था, पुणे मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व हिंदी विषय शिक्षकांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर पर्यवेक्षिका सौ.व्ही. जे. शेलार , प्राथमिकचे मुख्याध्यापक आर. व्ही. देसाई व त्याबरोबर आजरा महल शिक्षण संस्थेचे संचालक सचिनभैय्या शिंपी , सुनील पाटील ,सुधीर जाधव व विलास पाटील उपस्थित होते. या परीक्षेला 650 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सुवर्पदक देऊन गौरवण्यात आले. त्याबरोबर आदर्श शाळा व आदर्श हिंदी अध्यापक यांचाही सत्कार करण्यात आला. सर्व हिंदी विषय शिक्षक सौ.एस.डी ईलगे,श्रीम. आर. एन.पाटील, डी. आर. पाटील, व्ही.टी. कांबळे, श्रीम. एम. व्ही. बिल्ले ,सौ.स्मितल देसाई यांना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य मिळाले.
व्यंकटराव प्रशालेत येथे हिंदी ऑलिंपियाड परीक्षा पारितोषिक सोहळा संपन्न*
|