बातम्या
व्यंकटरावमध्ये संविधान दिन संपन्न
By nisha patil - 11/27/2025 11:55:12 AM
Share This News:
व्यंकटरावमध्ये संविधान दिन संपन्न
आजरा(हसन तकीलदार)**:-व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधानाच्या पुस्तक प्रतीचे पूजन प्रशालेचे प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर , व्यंकटराव प्राथमिकचे मुख्याध्यापक आर.व्ही. देसाई व सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत करणेत आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. वाय. भोये यांनी केले व संविधानाबद्दल व्ही.टी.कांबळे यांनी आपल्या मनोगतातून सविस्तर मांडले व सर्व विद्यार्थ्यांच्या आपापल्या घरी संविधानाची एक प्रत ठेवण्याचे असे आवाहन केले.
तसेच या संविधानाचे आपल्या जीवनातील महत्त्व तसेच संविधानाने संपूर्ण भारतातील जनतेला जात, पात, धर्म, पंथ विसरून आपण एक भारतीय आहोत याची जाणीव करून दिलेली आहे. म्हणूनच कोणत्याही प्रदेशात आपण आपली प्रथम ओळख करून देताना आम्ही भारतीय आहोत असे अभिमानाने सांगतो.
या संविधानाच्या विस्तृत अभ्यासपूर्ण लेखनासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली अभ्यासपूर्ण मेहनत आपल्या विचारातून स्पष्ट केली. या संविधानामध्ये महिलांना दिलेले स्वातंत्र्य, अधिकार यामुळे महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःला सिद्ध करण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत.. त्यांच्या आजच्या या ज्ञानाचा देशाच्या प्रगतीसाठी निश्चित मदत होत आहे. आपले संविधान हे जगात आदर्शवत संविधान असल्याचे सांगितले.
प्राचार्य एम. एम.नागुर्डेकर यांनीही संविधानाबद्दल आपले विचार मांडले. या कार्यक्रमासाठी सौ. एस.ईलगे,.एन.ए.मोरे श्रीमतीएस.टी.पाटील, व्ही.ए.वडवळेकर,सौ.ए.एस.गुरव उपस्थित होते. पी.व्ही.पाटील यांनी आभार मानले.. कार्यक्रमाच्या शेवटी मुंबई येथील 26- 11 रोजीच्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिक व कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
व्यंकटरावमध्ये संविधान दिन संपन्न*
|