बातम्या

व्यंकटराव येथे मराठी गौरव दिन उत्साहात संपन्न.

Vyanktrav education


By nisha patil - 1/3/2026 11:43:12 PM
Share This News:



*व्यंकटराव येथे मराठी गौरव दिन उत्साहात संपन्न.*.

आजरा(हसन तकीलदार)*:- येथील व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा येथे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य एम. एम.नागुर्डेकर पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार यांचे हस्ते करण्यात आले..

यावेळी मराठी विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. स्वराली सागर सावंत व स्वरा मेगुलकर (इ. पाचवी )यांनी कथा साजरी केली व इयत्ता नववी मधील सानवी चौगुले हिने अभिवाचन केले. हाजीक सय्यद याने मराठीचे महत्त्व सांगितले .आयुष गिरी याने गीत गायन केले.व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांनी समूहगीत व कविता सादर केल्या.

 श्रीमती.एन.ए.मोरे यांनी मराठी भाषा दिनाबाबत स्वरचित कविता सादर करून आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे आयोजक इयत्ता सहावी वर्गाच्या सर्व तुकडीचे वर्गशिक्षक व विद्यार्थ्यांनी केले. प्राचार्यांच्या हस्ते प्रशालेतील सर्व मराठी विषय शिक्षक शिक्षिका यांना पुष्पगुच्छ देऊन मराठी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.सूत्रसंचालन आरोही धडाम व अंजली भांदुर्गे यांनी व आभार सौ. एस.वाय.देसाई यांनी मानले.कार्यक्रमासाठी सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.


व्यंकटराव येथे मराठी गौरव दिन उत्साहात संपन्न.
Total Views: 5