बातम्या

व्यंकटराव शिक्षण संकुलात शिवजयंती उत्साहात संपन्न

Vyanktrav education shivjaynti


By nisha patil - 2/19/2026 2:46:39 PM
Share This News:



व्यंकटराव शिक्षण संकुलात शिवजयंती उत्साहात संपन्न

**आजरा(हसन तकीलदार)**:-येथील व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळचे संचालक सुधीर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक पांडुरंग जाधव ,सचिन शिंपी ,विलास पाटील उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे बद्दल बोलताना प्राध्यापक केतन सुतार यांनी सांगितले की, संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात परकीय सत्तांनी लढाया ,जाळपोळ, लुटालुट करून सारा महाराष्ट्र होरपळून टाकला होता. त्यांच्या तोफांच्या आगिने जमीन भाजून निघत होती. अशा या अंधाऱ्या वातावरणात शिवनेरी किल्ल्यावरून बालकाच्या रडण्याचा आवाज साऱ्या आसमंतात घुमला. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात पुन्हा पुन्हा घुमू लागला. जिजाबाईंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म झाला..

 जिजाऊंची शिकवण, मार्गदर्शन यातून छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि मावळ्यांच्या साथीने स्वराज्य स्थापन केले.अनेक गड किल्ले आपल्या ताब्यात घेतले या जीवन प्रवासात अनेक जीवघेण्या संकटावर प्रसंगी एकटे व काही वेळेला निष्ठावंत मावळ्यांच्या बलिदानातून महाराष्ट्र परकीयांच्या सत्तेतून स्वतंत्र केला. 

त्यानंतर व्ही.टी.कांबळे यांनी छ. शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आपल्या स्वरचित काव्यातून आणि चालीतून म्हणून दाखवली.

या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रतिमा पूजनासाठी प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे.शेलार, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख एम. ए.पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक आर. व्ही. देसाई सीनिअर कॉलेज विभाग प्रमुख खामकर सर, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


व्यंकटराव शिक्षण संकुलात शिवजयंती उत्साहात संपन्न
Total Views: 165