बातम्या
व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये बालदिन उत्साहात संपन्न
By nisha patil - 11/14/2025 10:32:16 PM
Share This News:
*व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये बालदिन उत्साहात संपन्न*
आजरा(हसन तकीलदार)**:-व्यंकटराव शिक्षण संकुलात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन "बालदिन" म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर व पर्यवेक्षिका .व्ही.जे. शेलार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
व्ही.एच गवारी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन कार्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. यामध्ये त्यांनी सांगितले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उभारलेल्या उच्च शैक्षणिक संस्था विषयी परिचय दिला. मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे असं समजून त्यांनी लहान मुलांवर प्रेम केले म्हणून त्यांचा जन्मदिवस *बालदिन* म्हणून साजरा केला जातो. मुले त्यांना प्रेमाने चाचानेहरू म्हणत असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता पाचवी ब ,क या वर्गांनी केले. वर्गशिक्षक सुनील पाटील व सौ.एस.पी.ढेकळे यांनी आपले विद्यार्थी उपस्थित ठेवले.. व विद्यार्थ्यांना त्यांनी खाऊ वाटप केले.
व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये बालदिन उत्साहात संपन्न
|