विशेष बातम्या
वहा से बोली चलेगी तो यहा से गोला चलेगा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
By nisha patil - 12/5/2025 2:35:02 PM
Share This News:
शस्त्रसंधी लागू झाल्यानंतरही जर पाकिस्तानकडून कोणतीही आगळी-वेगळी कृती झाली, तर भारत कठोर प्रतिउत्तर देईल, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. "वहा से गोली चलेगी तो यहा से गोला चलेगा," अशा शब्दांत त्यांनी भारताची भूमिका मांडली. रविवारी घेतलेल्या उच्चस्तरीय सुरक्षाविषयक बैठकीत पंतप्रधान बोलत होते.
पंतप्रधानांनी स्पष्ट केले की ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप पूर्ण झालेले नाही आणि दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका यापुढेही ठाम व कठोर राहील. पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन देणे थांबवले नाही, तर त्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.
वहा से बोली चलेगी तो यहा से गोला चलेगा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
|