बातम्या

वालावलकर हायस्कूलची  राज्यतरीय झेप ; जलतरण  स्पर्धेसाठी बेलवलकर बंधूंची निवड. 

Walawalkar High School makes it to the inter state level


By nisha patil - 11/16/2026 4:50:25 PM
Share This News:



वालावलकर हायस्कूलची  राज्यतरीय झेप ; जलतरण  स्पर्धेसाठी बेलवलकर बंधूंची निवड. 

कोल्हापूर: येथील आंतर भारती शिक्षण मंडळ संचलित मुक्तसैनिक विद्यापीठांतर्गत असणा-या शां.कृ.पंत वालावलकर हायस्कूल मधील जलतरणपटू   प्रसन्न बेलवलकर आणि त्याचा लहान भाऊ चिन्मय बेलवलकर  यांची राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेस विभागीय स्पर्धेतून अंतिम निवड झाली आहे. प्रसन्न बेलवेलकर याने 50 मीटर, 100 मीटर व 200 मीटर बटरफ्लाय  या प्रकारात रौप्यपदक  पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेस दिमाखाने पात्रता मिळवली  तर चिन्मय बेलवलकर  याने  50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक आणि 100 मीटर तसेच200 मीटर बॅकस्ट्रोक  प्रकारात रौप्यपदक  पटकावून  राज्यस्तरीय स्पर्धेस आपली पात्रता सिद्ध केली आहे.

त्याला संस्थेच्या कार्याध्यक्षा पल्लवी कोरगांवकर, अध्यक्षा सुचेता कोरगांवकर, शालेय समिती चेअरमन संजीव परीख,उपाध्यक्ष जीनरत्न रोटे, सचिव भरत अलगौंडर  यांसह सर्व संस्था पदाधिकारी तसेच  शाळेचे मुख्याध्यापक  संजय सौंदलगे  पर्यवेक्षिका  सरिता शिंदे,  जेष्ठ शिक्षक बाळासाहेब कागले यांचे प्रोत्साहन आणि क्रीडा शिक्षक समीर जमादार राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे,सागर वाडकर, उत्तम भोये जलतरण प्रशिक्षक समीर मुल्लाणी यांचे मार्गदशीन  लाभले. जलतरण क्रीडा प्रकारात शाळेचे नाव राज्यस्तरावर नेल्याबद्दल शाळेच्यावतीने प्रसन्न आणि चिन्मय बेलवलकर यांचा समयोचित सत्कार करण्यात आला .


वालावलकर हायस्कूलची  राज्यतरीय झेप ; जलतरण  स्पर्धेसाठी बेलवलकर बंधूंची निवड. 
Total Views: 17