बातम्या
चरचरणाऱ्या फॅन्टसीचे युद्ध’ व ‘कलम ३७५’ एकांकिका अंतिम फेरीत
By nisha patil - 8/26/2025 5:57:09 PM
Share This News:
चरचरणाऱ्या फॅन्टसीचे युद्ध’ व ‘कलम ३७५’ एकांकिका अंतिम फेरीत
नाट्य परिषद करंडक स्पर्धा; मुंबईत २५ एकांकिकांमध्ये रंगणार अंतिम लढत
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली. कोल्हापूर केंद्रातून शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभागाची ‘चरचरणाऱ्या फॅन्टसीचे युद्ध’ आणि शहाजी विधी महाविद्यालयाची ‘कलम ३७५’ या एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली.
सांगली केंद्रातून आर्यरुप नाट्यनिर्मिती थिएटरची ‘त्या रात्री’ आणि बाराखडी प्रॉडक्शनची ‘तुती’, तर रत्नागिरी केंद्रातून महाराजा फाउंडेशनची ‘कॉफीन’ या एकांकिकांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
स्पर्धेची अंतिम फेरी १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात होणार असून, यात एकूण २५ एकांकिका सादर होतील. विजेत्या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. तसेच अंतिम फेरीत पोहोचलेल्या संघांना नाट्य परिषदेच्यावतीने नामांकित दिग्दर्शकांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
ही स्पर्धा नवोदित लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. यंदा प्राथमिक फेरी एकूण १९ केंद्रांवर रंगली
चरचरणाऱ्या फॅन्टसीचे युद्ध’ व ‘कलम ३७५’ एकांकिका अंतिम फेरीत
|