राजकीय
ताराराणी आघाडीचा प्रभाग 10 मध्ये जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादात प्रचार दौरा
By nisha patil - 11/26/2025 11:09:48 AM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- आजरा नगरपंचायत निवडणुकीला आता चांगलाच रंग भरला आहे. प्रत्येक आघाड्या आपापल्या परीने प्रचाराचा जोर लावताना दिसत आहेत. ताराराणी आघाडीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.
मंगळवारी सकाळी प्रभाग क्रमांक 10मध्ये ताराने आघाडीच्या वतीने प्रचार दौरा करण्यात आला. या प्रचार दौऱ्यास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ताराराणी आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोकआण्णा काशिनाथ चराटी व प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार सिकंदर इस्माईल दरवाजकर यांच्या समर्थनार्थ प्रभाग क्रमांक 10 मधील कुंभार गल्ली व परिसरामध्ये रॅलीचे आयोजन व घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या.
या प्रभागामध्ये उमेदवारांच्याकडून होम टू होम प्रचार तसेच वैयक्तिक प्रचारावर भर देण्यात आला. या प्रचार रॅलीमध्ये बहुसंख्येने कार्यकर्ते व मतदार सहभागी झाले होते. विलासराव नाईक, विजयकुमार पाटील, जनार्दन टोपले, डॉ. दीपक सातोसकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष जी. एम. पाटील,वसीम दरवाजकर, शोएब दरवाजकर, बापू पारपोलकर, मोहम्मद दरवाजकर, भरत कांबळे, प्रशांत कुंभार, बाळू कुंभार,वासू केसरकर, प्रशांत कुंभार, जोतिबा कुंभार, अमोल कुंभार, प्रकाश कांबळे, संतोष कुंभार, संजय जांभळे, राजेंद्र कुंभार, सुधीर वडवळेकर, अमर कुंभार यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
ताराराणी आघाडीचा प्रभाग 10 मध्ये जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादात प्रचार दौरा
|