बातम्या
प्रभाग क्र. १३ मतदार यादीत गडबड; माजी उपमहापौर भूपाल शेटे यांची तक्रार ...
By nisha patil - 11/24/2025 4:17:47 PM
Share This News:
प्रभाग क्र. १३ मतदार यादीत गडबड; माजी उपमहापौर भूपाल शेटे यांची तक्रार ...
राजकीय दबावाखाली यादी तयार केल्याचा आरोप...
प्रभाग क्र. १३ मधील मतदार यादीत गडबड झाल्याचा आरोप माजी उपमहापौर भूपाल महिपती शेटे यांनी केला आहे. शेटेंच्या तक्रारीनुसार, प्रभागाचे बी.एल.वो. किरण मुळे आणि इतर बी.एल.वो., सुपरवायझर श्रीकांत देवकर, उपशहर अभियंता अरूण गुजर व मुख्य निवडणूक अधिकारी सुधाकर चल्लावाड यांनी जागेवर जाऊ न देता कार्यालयात बसून ही प्रारूप मतदार यादी तयार केली.
शेटेंचा असा दावा आहे की या चुकीमुळे प्रभाग क्र. १३ मधील सुमारे ३,२०० मतदार वंचित राहणार आहेत. त्यामुळे त्यांनी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे तक्रार करत, या प्रभागातील सर्व मतदारांची संपूर्ण स्थळांवर जाऊन पाहणी करून यादी दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरीत निलंबन व फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या तक्रारीची माहिती राज्य निवडणूक आयोगासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे आणि प्रभाग क्र. १३ व १८ च्या मतदार यादीतील गडबड गांभीर्याने तपासली
प्रभाग क्र. १३ मतदार यादीत गडबड; माजी उपमहापौर भूपाल शेटे यांची तक्रार ...
|