बातम्या

इचलकरंजी महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर – 65 जागांसाठी होणार निवडणूक

Ward structure of Ichalkaranji Municipal


By nisha patil - 5/9/2025 3:17:45 PM
Share This News:



इचलकरंजी महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर – 65 जागांसाठी होणार निवडणूक

इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठीची प्रभाग रचना अखेर निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. एकूण 65 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार असून, चार सदस्यांचे प्रभाग तसेच एक पाच सदस्यांचा प्रभाग अशा स्वरूपात रचना निश्चित करण्यात आली आहे.

यामध्ये प्रभाग क्रमांक 16 गावभाग परिसर हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रभाग ठरणार आहे. तर प्रभाग क्रमांक 13 हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रभाग म्हणून ओळखला जाणार आहे.

प्रभाग रचनेमुळे अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसला असला तरी काहींना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या प्रभाग रचनेनंतर आता इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीला वेग आला आहे.

राजकीय समीकरणांचा विचार करता, महायुतीतील नेते स्वबळावर लढणार की एकत्रितपणे हे मोठे प्रश्नचिन्ह आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे.


इचलकरंजी महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर – 65 जागांसाठी होणार निवडणूक
Total Views: 177