बातम्या
प्रस्थापित पक्षांना इशारा : "सामान्य माणसाच्या मताचा दणका दाखवू" – शिवाजीराव आवळे
By nisha patil - 8/7/2025 6:19:44 PM
Share This News:
प्रस्थापित पक्षांना इशारा : "सामान्य माणसाच्या मताचा दणका दाखवू" – शिवाजीराव आवळे
बंडखोर सेनेत ११ नव्या सदस्यांचा प्रवेश, ९ जणांची घरवापसी, २२ जणांना जबाबदाऱ्या
सांगली | दि. ८ जुलै २०२५ | प्रतिनिधी - किशोर जासूद बंडखोर सेना पक्षाच्या सांगलीत पार पडलेल्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी स्पष्ट शब्दांत प्रस्थापित पक्षांना इशारा दिला की, "सामान्य माणसाच्या मताचा दणका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत नक्कीच दिसून येईल." या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बी. डी. पाटील होते.
महागाई, भ्रष्टाचार, आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे दुर्लक्ष करून सरकार सामान्य माणसाला जाती-धर्मात अडकवत असल्याचा आरोप आवळे यांनी केला. बैठकीत ११ नव्या सदस्यांचा पक्षप्रवेश, ९ जणांची घरवापसी, तसेच २२ कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या जाहीर करण्यात आल्या.
बैठकीत मराठी भाषेच्या मुद्द्यावर शिवसेना (ठाकरे) आणि मनसेला पाठिंबा देण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी संघटनात्मक नियोजनावर भर देण्यात आला.
महत्त्वाच्या मान्यवरांची उपस्थिती: शिवाली आवळे (महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा), अमोल भोसले (युवक प्रदेश अध्यक्ष), नागनाथ देसाई (राज्य सल्लागार), दिनेश मोरे (प.म. कार्याध्यक्ष), जयसिंगराव चव्हाण (प.म. सल्लागार), विजय लोखंडे (कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष), संजय खांडेकर (पुणे जिल्हा अध्यक्ष), उमेश कांबळे (सांगली जिल्हा उपाध्यक्ष), सुरेश आवळे (हातकणंगले तालुका अध्यक्ष), प्रविन सुतार (वाळवा तालुका अध्यक्ष), विद्या सावंत (मिरज तालुका महिला आघाडी अध्यक्षा), सुशीला जाधव (वाळवा तालुका महिला आघाडी अध्यक्षा), अभिषेक भंडारे, अजय साळवे, विशाल मोहिते, नवनाथ भोसले, सुजित भोसले, प्रविन फाळके, वैभव दबडे, सुहास जाधव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रस्थापित पक्षांना इशारा : "सामान्य माणसाच्या मताचा दणका दाखवू" – शिवाजीराव आवळे
|