बातम्या
कोल्हापुरात पाणीटंचाईचा भडका
By nisha patil - 8/28/2025 1:08:10 PM
Share This News:
कोल्हापुरात पाणीटंचाईचा भडका!
भाजपकडून प्रशासनाला धारेवर..नागरिकांचा संताप वाढला
सणासुदीच्या तोंडावर कोल्हापुरकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. घरगुती कामे ठप्प होऊन नागरिकांना आता थेट अधिकाऱ्यांना जाब विचारावा लागत आहे.
नागरिकांच्या व्यथांना आवाज देत भाजप पदाधिकारी महेश जाधव यांनी प्रशासनाचा समाचार घेतला. "थेट पाईपलाईन कुठे आहे?" असा सवाल करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
पाणी मिळावे म्हणून लोकांची अक्षरशः धावपळ सुरू असून प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कोल्हापुरात पाणीटंचाईचा भडका
|