बातम्या

ऐन सणासुदीच्या काळात कोल्हापूरच्या उंच भागात पाणीपुरवठा विस्कळीत

Water supply disrupted


By nisha patil - 8/26/2025 12:16:37 PM
Share This News:




ऐन सणासुदीच्या काळात कोल्हापूरच्या उंच भागात पाणीपुरवठा विस्कळीत

कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी येथील एका पंपाचा व्हीएफडी कार्ड खराब झाल्याने शहरातील उंच भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.

महापालिकेकडून तातडीने दुरुस्तीचे काम रात्रीपासून सुरू करण्यात आले असून, आज दुपारी ३ वाजेपर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सदर व्हीएफडी कार्ड कार्यरत झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

दरम्यान, शहरातील इतर भागांना उर्वरित दोन पंपांच्या माध्यमातून नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, सणासुदीच्या काळात उंच भागातील नागरिकांना पाणीपुरवठ्यातील अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 


ऐन सणासुदीच्या काळात कोल्हापूरच्या उंच भागात पाणीपुरवठा विस्कळीत
Total Views: 68