बातम्या

महावितरणच्या कामामुळे १९ व २० जानेवारी रोजी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

Water supply in the city disrupted on January 19th and 20th due to Mahavitaran work


By Administrator - 1/17/2026 3:06:01 PM
Share This News:



कोल्हापूर:- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) वतीने काळम्मावाडी ३३ केव्ही उपकेंद्र येथे आयसोलेटर बसविण्याचे काम सोमवार व मंगळवार, दि. १९ व २० जानेवारी २०२६ रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने काळम्मावाडी योजनेतून कोल्हापूर शहरास होणारा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.

            शहरास पर्यायी पाणीपुरवठा करण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी येथील पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. तथापि, या व्यवस्थेमुळे शहरातील दैनंदिन पाणीपुरवठा अपुरा तसेच कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. बुधवार, दि. २१ जानेवारी २०२६ रोजी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

            या कालावधीत ए व बी वॉर्ड तसेच त्यास सलग्न उपनगरे व ग्रामीण भाग, लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजीनगर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठेतील काही भाग, दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी, बुधवार पेठ तालीम परिसर, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस परिसर, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज परिसर, महालक्ष्मी मंदिर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब व त्यास सलग्न उपनगरे व ग्रामीण भाग, तसेच ई वॉर्ड अंतर्गत संपूर्ण कसबा बावडा, रमणमळा, ताराबाई पार्क, कदमवाडी, भोसलेवाडी, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, बापट कॅम्प, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, लिशा हॉटेल परिसर, महाडीक वसाहत, टेंबलाईवाडी, माळी कॉलनी, साईक्स एक्स्टेंशन, राजारामपुरी १ ली ते १३ वी गल्ली, मातंग वसाहत, यादव नगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, राजारामपुरी एक्स्टेंशन, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, प्रतिभानगर, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा परिसर, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन, ग्रीन पार्क परिसर, शाहुपुरी १ ली ते ४ थी गल्ली, व्यापार पेठ आदी भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.


महावितरणच्या कामामुळे १९ व २० जानेवारी रोजी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत
Total Views: 32