बातम्या
कोल्हापूरला पाणीपुरवठा ठप्प; १६५ कोटी थकबाकीमुळे पाटबंधारे विभागाची मोठी कारवाई
By Administrator - 3/20/2026 3:49:54 PM
Share This News:
कोल्हापूरला पाणीपुरवठा ठप्प; १६५ कोटी थकबाकीमुळे पाटबंधारे विभागाची मोठी कारवाई
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका वर तब्बल १६५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याने पाटबंधारे विभागाने कठोर पाऊल उचलत शहराचा पाणीपुरवठा तोडला आहे. या कारवाईत नागदेववाडी, शिंगणापूर, बालिंगा आणि काळम्मावाडी येथील उपसा केंद्रे सील करण्यात आली आहेत.
माहितीनुसार, थकबाकी भरण्यासाठी वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित उपसा केंद्रांवर जाऊन यंत्रणा बंद करून ती सील केली. या अचानक झालेल्या कारवाईमुळे महापालिकेवर मोठी नामुष्की ओढवली आहे.
दरम्यान, या निर्णयाचा थेट परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता असून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरला पाणीपुरवठा ठप्प; १६५ कोटी थकबाकीमुळे पाटबंधारे विभागाची मोठी कारवाई
|