विशेष बातम्या
2 जून रोजी कोल्हापुरातील चार वॉर्डांतील पाणीपुरवठा बंद
By nisha patil - 5/31/2025 3:28:59 PM
Share This News:
2 जून रोजी कोल्हापुरातील चार वॉर्डांतील पाणीपुरवठा बंद
चंबुखडी टाकीवरील मॅनिफोल्ड कामामुळे पाणी कमी दाबाने येणार
चंबुखडी टाकीवर मॅनिफोल्ड बसविण्याचे काम हाती घेतल्याने सोमवार, 2 जून 2025 रोजी कोल्हापुरातील ए, बी, सी, डी वॉर्डातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. तसेच 3 जून रोजी पाणी अपुरा व कमी दाबाने येणार आहे. फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, शिवाजी पेठ, शुक्रवार पेठ, शाहूपुरीसह अनेक भागांतील नागरिकांना याचा फटका बसणार आहे. महापालिकेने पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.
2 जून रोजी कोल्हापुरातील चार वॉर्डांतील पाणीपुरवठा बंद
|