बातम्या
ऐतिहासिक जयसिंगराव तलावात राजे विरेंद्रसिंह घाटगे यांचे जलपूजन
By nisha patil - 8/20/2025 2:36:43 PM
Share This News:
ऐतिहासिक जयसिंगराव तलावात राजे विरेंद्रसिंह घाटगे यांचे जलपूजन
गाळ काढणी उपक्रमामुळे जलसिंचन क्षमता वाढल्याने नागरिकांत समाधान
कागल : छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळात पिराजीराव घाटगे यांनी बांधलेला १३१ वर्षे जुना ऐतिहासिक जयसिंगराव तलाव यंदा पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरला असून, राजे विरेंद्रसिंह घाटगे यांच्या हस्ते तलावातील पाण्याचे विधीवत पूजन करण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यामुळे झालेल्या गाळ काढणीमुळे तलावाची पाणी साठवण क्षमता वाढली. त्यामुळे यावर्षी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, अशी दिलासा देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना सुपीक गाळ मिळून शेती उत्पादनक्षमतेतही वाढ झाली. जलपूजनावेळी स्थानिक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐतिहासिक जयसिंगराव तलावात राजे विरेंद्रसिंह घाटगे यांचे जलपूजन
|