बातम्या
"७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा पचविला, पण उस उत्पादकांचा पैसा पचू देणार नाही" – राजू शेट्टींचा अजित पवारांवर घणाघाती हल्ला
By nisha patil - 11/9/2025 4:55:07 PM
Share This News:
"७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा पचविला, पण उस उत्पादकांचा पैसा पचू देणार नाही" – राजू शेट्टींचा अजित पवारांवर घणाघाती हल्ला
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा पचविला म्हणून उस उत्पादक शेतकऱ्यांचा पैसा पचू देणार नाही, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज जोरदार टीका केली.
राज्य सरकार व कारखानदारांच्या दबावाखाली बेकायदेशीर एफ.आर.पी. समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणारे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबई उच्च न्यायालयाने एकरकमी एफ.आर.पी. देण्याबाबत स्पष्ट आदेश देत राज्य सरकारचा २०२१ मधील निर्णय रद्द केला आहे. तरीही उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली चालणारी समिती त्याच वर्षाचा साखर उतारा गृही धरून एफ.आर.पी. तुकड्यांत देण्याचा निर्णय घेत असल्याचे शेट्टींनी सांगितले.
उत्तरप्रदेशातही अशा पद्धतीने प्रयत्न झाला होता, पण न्यायालयाने तो हाणून पाडला. केंद्र सरकारनेही शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार एकरकमी एफ.आर.पी. देण्याचे आदेश दिले आहेत.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखानदारांच्या लाचारीपेक्षा उस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे," असे आवाहन शेट्टींनी केले.
"७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा पचविला, पण उस उत्पादकांचा पैसा पचू देणार नाही" – राजू शेट्टींचा अजित पवारांवर घणाघाती हल्ला
|