बातम्या

बदलत्या शिक्षण पद्धतींचा अवलंब करून राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान द्यावे - विश्वजीत भोसले

We should contribute to nation building


By nisha patil - 11/29/2025 2:40:59 PM
Share This News:



बदलत्या शिक्षण पद्धतींचा अवलंब करून राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान द्यावे - विश्वजीत भोसले

 
कोल्हापूर दि. 29 : स्पर्धात्मक युग, बदललेल्या अध्यापन पद्धती आणि गतिमान जीवनधारणा यामुळे शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे.पारंपारिक शिक्षणपद्धती मधून यशस्वीता संपादन करण्यासाठी विद्यार्थी दशेत अभ्यासक्रमाला सहाय्यक असणाऱ्या साधनसामग्रीचे आकलन करून काल सुसंगत राहिल्यास येणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ते सारख्या आवाहनांना सक्षमपणे सामोरे जाता येते.शिक्षणातून मिळणाऱ्या पदवीसोबत त्यामधून मिळणाऱ्या संधींची संख्या वाढवण्यासाठी वास्तवाचे भान, सामाजिक गरजा आणि आपल्या क्षमता यांचा सुवर्ण मध्य काढावा असे मत विश्वजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी वीज महावितरण कोल्हापूर विभागीय परिमंडळ  यांनी विवेकानंद कॉलेज कोल्हापूरमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या उभारणी दिनानिमित्तच्या कार्यक्रम प्रसंगी  मार्गदर्शनापर भाषणात मांडले मत मांडले. 

पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये वेगवेगळे विषय शिकविले जात असताना ते सुलभ किंवा कठीण अशी वर्गवारी करू नये . निवडलेल्या विषयांमध्ये शैक्षणिक पात्रता पूर्ण करताना त्या विषयांमध्ये पारंगत होऊन अग्रक्रमाने पुढे राहावे . ज्यामुळे पदवीनंतर समाजामध्ये वावरताना येणाऱ्या असंख्य आवाहनांना सक्षमपणे सामोरे जाण्याचे सामर्थ्य निर्माण करता येते. असे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांनी अध्यक्षीय मनोगतात मांडले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सार्जंट सायली वाडकर आणि सूत्रसंचालन अर्जंट नेहा मेहरवाडे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सचिवा प्राचार्य  शुभांगी गावडे, संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, आय क्यू एस सी प्रमुख डॉ श्रुती जोशी, कर्नल मानस दीक्षित, कर्नल विक्रम नलवडे ,मेजर सुनिता भोसले, प्रबंधक  धनवडे, कार्यालयीन वृंद यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमासाठी एनसीसीचे छात्र उपस्थित होते .

 


बदलत्या शिक्षण पद्धतींचा अवलंब करून राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान द्यावे - विश्वजीत भोसले
Total Views: 17