बातम्या

कसबा सांगावच्या प्रलंबित  प्रश्नांवर  प्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू-मंत्री हसन मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे यांची संयुक्तपणे ग्वाही

We will follow up with the Chief Minister regarding


By Administrator - 7/7/2026 1:53:01 PM
Share This News:



कसबा सांगावच्या प्रलंबित  प्रश्नांवर  प्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू-मंत्री हसन मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे यांची संयुक्तपणे ग्वाही

विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा उत्साहात

कसबा सांगाव,प्रतानिधी : कसबा सांगावच्या प्रलंबित  प्रश्नांवर चर्चेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे लवकरच संयुक्त बैठक  घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रसंगी मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू.तसेच विकासकामांसाठी भक्कमपणे पाठीशी राहू.अशी ग्वाही  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह  घाटगे यांनी संयुक्तपणे दिली.
 
कसबा सांगाव ता.कागल येथे पंधराव्या वित्त आयोग व ग्रामपंचायतीच्या निधीतून सुमारे एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच ॲड.वीरश्री जाधव होत्या.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,कसबा सांगाव मधील नळ पाणीपुरवठा योजनेसाठीची सोलर योजना,जल जीवन, प्रॉपर्टी कार्ड, घनकचरा व्यवस्थापनसह इतर विकासकामे मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायतीस सर्वोतोपरी सहकार्य करु.तसेच कॅनाॕलचे पाणी सुद्धा कसबा सांगावपर्यंत आणण्याचे नियोजन आहे.

शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,आम्ही  तीन नेते एकत्र आल्यामुळे विकास कामासाठी चांगले निर्णय घेता येणार आहेत.सांगावच्या सरपंच व सदस्यांनी गावाच्या विकासासाठी आदर्शपणे नियोजन केले आहे.त्यांना युतीचे तिन्ही नेते विकासकामाच्या निधीसाठी पाठबळ देऊ.गावच्या विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून एकत्र या.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील,युवराज पाटील,ॲड. बाबासाहेब मगदूम यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत,सदस्या सुवर्णा कांबळे, पंचायत समितीचे उपसभापती इंद्रजीत पाटील,सदस्य अनिलकुमार हेगडे, तेजस्वीनी भोरे ,बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील,अमोल माळी,श्रीकांत माळी,कैलास जाधव,बाळासो गुरव उपसरपंच रेखा आवळे,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविकास अधिकारी श्रीकांत कोळी आदी उपस्थित होते.
स्वागत विनोद आवळे यांनी केले.उपसरपंच सुदर्शन मजले यांनी प्रास्तविक केले.अमर कांबळे यांनी आभार मानले.


८५ वर्षांवरील ज्येष्ठांना दरमहा ५०० रुपये; अंत्यविधी अनुदानातही वाढ

अध्यक्षीय भाषणात सरपंच ॲड. वीरश्री जाधव यांनी येत्या १५ ऑगस्टपासून ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ५०० रुपये आर्थिक मदत तर मागासवर्गीयांसाठी अंत्यविधी अनुदान १,५०० रुपयांवरून २,००० रुपये करण्यात येणार असून सर्वसाधारण नागरिकांनाही २,००० रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा केली.विविध विकासकामांचा आढावा घेत प्रलंबित प्रश्नांकडे लक्षि वेधले.


कसबा सांगावच्या प्रलंबित  प्रश्नांवर  प्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू-मंत्री हसन मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे यांची संयुक्तपणे ग्वाही
Total Views: 13