विशेष बातम्या
“मराठी मानाचा हक्क अबाधित ठेवणार!” — बेळगाव सीमेला शिवसेनेचा निर्धार, जिल्हाबंदी झुगारून आंदोलनात उतरतील शिवसैनिक
By nisha patil - 1/11/2025 4:33:45 PM
Share This News:
“मराठी मानाचा हक्क अबाधित ठेवणार!” — बेळगाव सीमेला शिवसेनेचा निर्धार, जिल्हाबंदी झुगारून आंदोलनात उतरतील शिवसैनिक
मराठी भाषिकांच्या हक्कासाठी पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रणसज्ज झाली आहे. शनिवार, १ नोव्हेंबर रोजी शिनोळी फाटा (ता. चंदगड) येथे काळादिन पाळून जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानंतर शिवसैनिक बेळगावमध्ये प्रवेश करून मराठी माणसाच्या न्यायासाठी लढा देणार आहेत. जिल्हाबंदीचे आदेश असूनही “बंदी झुगारून मराठींसाठी बेळगावमध्ये प्रवेश करणारच,” असा ठाम इशारा शिवसेना नेते विजय देवणे यांनी दिला आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी सर्व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
“मराठी मानाचा हक्क अबाधित ठेवणार!” — बेळगाव सीमेला शिवसेनेचा निर्धार, जिल्हाबंदी झुगारून आंदोलनात उतरतील शिवसैनिक
|