शैक्षणिक
विवेकानंद महाविद्यालयात ‘परदेशातील उच्च शिक्षण संधी’ या विषयावर वेबिनार
By nisha patil - 7/8/2025 5:38:34 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयात ‘परदेशातील उच्च शिक्षण संधी’ या विषयावर वेबिनार
कोल्हापूर दि.07 : विवेकानंद महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने "परदेशातील उच्च शिक्षण संधी" या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनारमध्ये प्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती पल्लवी देसाई (संस्थापिका, ॲचिव्हर्स ॲकेडेमी, कोल्हापूर) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वेबिनारमध्ये परदेशातील उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारी तयारी, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती योजना, व्हिसा व निवासव्यवस्था याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, इंग्रजी प्राविण्य चाचण्या (GRE, SAT, IELTS, TOEFL etc.) कशा प्रकारे पार कराव्यात याबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले. श्रीमती देसाई यांनी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेताना येणाऱ्या संधी, करिअरच्या दृष्टीने फायदे तसेच सांस्कृतिक अनुभव याविषयी माहिती दिली. सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध शंकांचे निरसन करून आवश्यक सल्ला घेतला.
अध्यक्षीय मनोगतात मा. प्राचार्य डॉ.आर. आर. कुंभार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात या संधीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता वाढवावी, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षच्या समन्व्यक डॉ. श्रुती जोशी, रजिस्ट्रार श्री. एस. के. धनवडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
प्रमुख वक्त्यांची ओळख वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. टी. दांगट यांनी करून दिली. आभार डॉ.ए.आर.कासारकर यांनी मानले. सदर वेबिनार मध्ये महाविद्यालयातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ. प्रिया पाटील व डॉ. स्नेहल वाडकर यांनी केले.
विवेकानंद महाविद्यालयात ‘परदेशातील उच्च शिक्षण संधी’ या विषयावर वेबिनार
|