मनोरंजन
आदेश बांदेकरांच्या घरी लग्नाची धामधूम
By nisha patil - 8/19/2025 1:29:02 PM
Share This News:
आदेश बांदेकरांच्या घरी लग्नाची धामधूम! मुलगा सोहम बांदेकरचा विवाह अभिनेत्री पूजा बिरारीसोबत होणार
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नाच्या चर्चांना जोर चढला आहे. ‘घरकुल’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले आणि प्रेक्षकांचे लाडके सुत्रसंचालक आदेश बांदेकर व त्यांची पत्नी सचित्रा बांदेकर यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे.
त्यांचा मुलगा सोहम बांदेकर आता आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार असून, त्याची जीवनसाथी म्हणून छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बिरारी ठरणार आहे.
पूजा बिरारीने ‘येड़ लागला प्रेमाचा’, ‘स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा’, ‘सजना’ या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिचं सौंदर्य आणि अभिनय यामुळेच ती आजच्या पिढीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
लग्नाची बातमी बाहेर आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बांदेकर कुटुंब आणि बिरारी परिवारात लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
आदेश बांदेकरांच्या घरी लग्नाची धामधूम
|