खेळ
तेंडुलकर घरात उत्सवाची धामधूम; अर्जुन तेंडुलकर ५ मार्चला विवाहबंधनात
By nisha patil - 8/1/2026 1:54:01 PM
Share This News:
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या घरी लवकरच मंगलमय वातावरण पाहायला मिळणार आहे. सचिन तेंडुलकर यांचा सुपुत्र अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाहसोहळा येत्या ५ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
लग्नापूर्वीचे पारंपरिक विधी आणि इतर समारंभांना ३ मार्चपासून सुरुवात होणार असून, हे सर्व कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत आयोजित करण्यात येणार आहेत.
तेंडुलकर कुटुंबीयांनी हा विवाहसोहळा अतिशय खाजगी आणि साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या आनंदाच्या क्षणांना केवळ जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच क्रिकेट विश्वातील काही मोजके मान्यवर आणि दिग्गज खेळाडू उपस्थित राहणार आहेत.
क्रिकेट विश्वातील एका लोकप्रिय कुटुंबातील हा विवाहसोहळा असल्याने, चाहत्यांमध्येही याबाबत उत्सुकता आहे. मात्र, कोणत्याही प्रकारचा गाजावाजा टाळत, कुटुंबीयांच्या सान्निध्यात हा सोहळा पार पडणार असल्याचे समजते.तेंडुलकरांच्या घरी लगीनघाई; अर्जुन तेंडुलकर ५ मार्चला सानिया चंडोकशी विवाहबद्ध
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या घरी लवकरच मंगलमय वातावरण पाहायला मिळणार आहे. सचिन तेंडुलकर यांचा सुपुत्र अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाहसोहळा येत्या ५ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
लग्नापूर्वीचे पारंपरिक विधी आणि इतर समारंभांना ३ मार्चपासून सुरुवात होणार असून, हे सर्व कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत आयोजित करण्यात येणार आहेत.
तेंडुलकर कुटुंबीयांनी हा विवाहसोहळा अतिशय खाजगी आणि साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या आनंदाच्या क्षणांना केवळ जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच क्रिकेट विश्वातील काही मोजके मान्यवर आणि दिग्गज खेळाडू उपस्थित राहणार आहेत.
क्रिकेट विश्वातील एका लोकप्रिय कुटुंबातील हा विवाहसोहळा असल्याने, चाहत्यांमध्येही याबाबत उत्सुकता आहे. मात्र, कोणत्याही प्रकारचा गाजावाजा टाळत, कुटुंबीयांच्या सान्निध्यात हा सोहळा पार पडणार असल्याचे समजते.

|