बातम्या

“आठवडा बाजार सध्याच्याच ठिकाणी कायम राहील” – आमदार राहुल आवाडे

Weekly market will remain at its current location


By nisha patil - 1/9/2025 5:48:02 PM
Share This News:



 “आठवडा बाजार सध्याच्याच ठिकाणी कायम राहील” – आमदार राहुल आवाडे

शहापूर येथे आर.टी.ओ. कार्यालय उभारणीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस आमदार डॉ. राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. इंगवले उपस्थित होते. बैठकीत आर.टी.ओ. कार्यालयासाठी योग्य ठिकाणी जागा निश्चित करून तातडीने मोजणी करण्याचे आदेश देण्यात आले.

विशेष म्हणजे, शहापूरचा आठवडा बाजार सध्याच्याच ठिकाणी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आर.टी.ओ. कार्यालयासाठी विनायका शाळा, आठवडा बाजार, कुस्ती मैदान, यात्रा भरण्याची जागा व बिरदेव मंदिर परिसर वगळून इतर उपलब्ध जागांमध्ये मोजणी करण्याचे आदेश देण्यात आले.

या वेळी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी स्पष्ट आश्वासन दिले की, “आठवडा बाजार जिथे आहे, तिथेच कायम राहील.”
या निर्णयामुळे शहापूर व परिसरातील नागरिकांना आर.टी.ओ. संदर्भातील सर्व शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभ व जलद गतीने उपलब्ध होणार आहेत. यामुळे नागरिकांचा प्रवास व वेळेची बचत होणार आहे.

बैठकीस विविध लोकप्रतिनिधी, मान्यवर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


“आठवडा बाजार सध्याच्याच ठिकाणी कायम राहील” – आमदार राहुल आवाडे
Total Views: 58