बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये नवनियुक्त शिक्षकांचे स्वागत व उदबोधन
By Administrator - 9/16/2025 3:04:45 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये नवनियुक्त शिक्षकांचे स्वागत व उदबोधन
कोल्हापूर. दि. 16 : शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये विवेकानंद जुनिअर विभागामध्ये हजर झालेल्या नवनियुक्त शिक्षकांचे स्वागत व उदबोधन कार्यक्रम शनिवार दि.13.09.2025 रोजी ज्युनिअर सायन्स सांस्कृतिक विभागातर्फे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.सौ. गीतांजली साळुंखे उपस्थित होत्या. प्रास्ताविक व स्वागत प्रा.एम. आर. नवले यांनी केले. नवनियुक्त शिक्षकांचा स्वागतानंतर प्राध्यापिका डॉ.ए बी पाटील यांनी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक कार्य व समाजासाठी योगदान या विषयावर मार्गदर्शन केले. नवनियुक्त शिक्षकांनी बापूजींच्या कार्याचा आदर्श घेऊन संस्थेच्या नावलौकिकात भर घालण्याविषयीचे आव्हान केले. प्रा.सौ गीतांजली साळुंखे व प्रा.सौ एम बी साळुंखे यांनी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या निस्वार्थ समाजउपयोगी कार्याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आर आर कुंभार सर यांनी आपल्या मनोगतातून नवनियुक्त शिक्षकांना अनमोल व मार्गदर्शक सूचना दिल्या तसेच त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका सौ.एस ए मोहिते यांनी केले, सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ.ए पी पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला ज्युनिअर सायन्स विभागाचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये नवनियुक्त शिक्षकांचे स्वागत व उदबोधन
|